मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. आजपर्यंत मुक्ताने काम केलेले बरेच चित्रपट मोठ्या प्रमाणत गाजले. आपल्या नॅचरल अभिनयाने मुक्ताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नुकतीच मुक्ताने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात तिचा फोटो असून वर शुभमंगल वधू वर सूचक मंडळ असं लिहलंय. पण मुक्ताने वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवलेल नसून तिची ‘अजूनही बरसत आहे ‘ ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे.
या मालिकेसाठी तिने ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यात बाजूला तिची म्हणजेच तिने साकारलेल्या भूमिकेची सगळी माहिती लिहली आहे. मालिकेत मुक्ता साकारत असलेल्या भूमिकेला लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू आहे. म्हणूनच मालिकेच्या प्रमोशनसाठी तिने ही पोस्ट शेअर केली.
या मालिकेत मुक्तासोबत अभिनेता उमेश कामत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर तुम्हीही उत्सुक असाल मुक्ताला नव्या भूमिकेत पाहायला.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.