प्रिया बापटला करावा लागतो आहे ‘ट्रोलिंगचा’ सामना

महाराष्ट्राची भाषा मराठी आहे पण महाराष्ट्रात विविध भाषा बोलणारे लोकही एकत्र असल्याने इतर भाषांचा वापर सर्रास होताना दिसतो. पण नुकताच सोशल मीडियावर मराठी आणि हिंदी असा वाद दिसून आला.

याला कारण ठरली प्रिया बापटची ऍड. प्रिया उमेश सोबत नुकतीच एका ऍडमध्ये दिसली. ऍड सोशल मीडियावर वायरल होताच हिंदीमध्ये असल्याने अनेक नेटकऱ्यांनी प्रियाला ट्रोल करायला सुरुवात केली.

डोंबिवलीत बहुतांश मराठी माणसे राहतात तरीही मराठीला वगळून हिंदी भाषेत ऍड असल्याबद्दल नेटरेजन्सी नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रियानेही ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रिया म्हणते, डोंबिवलीत घर काय घर फक्त मराठी माणसचं घेतात का? माझी मातृभाषा मराठी आहे म्हणजे भारतात फक्त मराठीच बोलतात का? मग तुम्ही हिंदी चित्रपट, English webs series का बघता? एकीकडे मराठी कलाकारांना सतत विचारायचं की तुम्ही हिंदीत काम का करत नाही?

आणि जर सर्वांना समजेल अशा भाषेत जाहिरात केली तर असे टोमणे मारायचे. तुमच्या दुटप्पीपणाचं दुःख वाटतं. प्रियाच्या या भूमिकेला अनेकांनी पाठींबा दर्शवला आहे तर अनेकांनी तिच्या विरोधात कमेंट केली आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *