काळ्या मिरीचे 9 दाणे गुपचूप फेका इथे नजर बाधा दोष संपतील पैसा इतका येईल की

दररोज मनोभावे सर्व देवी-देवतांची पूजा केली. आराधना केली. मात्र कुलदेवता जर विसरलात तर सर्व प्रकारची पूजा व्यर्थ ठरते. त्या पूजेचे फळ मिळत नाही आणि म्हणून विनंती आहे. की आपलं जे कुलदैवत आहे जे इष्टदेव आहेत त्यांची पूजा आपण अवश्य करा. कुलदेव माहीत नसेल. इष्टदैवत माहीत नसतील. तर आपल्या जुन्या जातीच्या वाडवडिलांना पूर्वजांना विचारा आणि त्याबद्दलची माहिती करून घ्या.

आज जो उपाय आपण पाहणार आहोत. नऊ काळ्या मिरीचे दाणे. तंत्रशास्त्रात काळी मिरी असेल. लवंग असेल. इलायची असेल या पदार्थांचा वापर उर्जा वाहक म्हणून केला जातो. हे पदार्थ ऊर्जेचे वाहक असतात. आपल्या अवतीभवती आपल्या वास्तूमध्ये आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये सातत्याने सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जांचा प्रवाह सातत्याने चालू असतो.

जेव्हा जेव्हा आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला अगर आपल्या वास्तूला किंवा आपल्या घराला एखाद्या व्यक्तीची नजर लागते वाईट नजर. तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उपलब्ध होतात. कधीकधी आपल्या वास्तूवर काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्याला टोटके असे म्हणतात. कधी कधी आपल्या हातून सुद्धा अशा चुका नकळत घडतात.

रस्त्यामध्ये आपण अशा काही पदार्थांना ओलांडतो किंवा त्यावरती पाय देऊन जातो. की आपल्या वरती सुद्धा या नकारात्मक शक्ती हावी होतात. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा. कोणत्याही मार्गांचा अवलंब करा. मात्र उद्योग-धंद्यात व्यवसायामध्ये यश मिळत नाही. लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. पैसा येता-येता थांबतो. अगदी मोठमोठ्या संधी डोळ्यादेखत निघून जातात. मात्र त्या संधींचा लाभ घेता येत नाही.

आपल्याही बाबतीत जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील आणि आपल्याला अशी शंका आहे. की आपण प्रयत्न तर अगदी व्यवस्थित करत आहात. पुरेसे प्रयत्न आपल्या कडून होत आहेत. मात्र तरी सुद्धा यश मिळत नसेल कामामध्ये. काम पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सातत्याने आजारी पडते. तिच आरोग्य सतत खालावलेल असत.

औषधोपचार करून सुद्धा त्या व्यक्तीची प्रकृती जर खालावतच जात असेल. तर अशा वेळी या नऊ काळ्या मिरचा उपाय आपण अवश्य करून पाहा. तुमच्या घरातील मूल जर सतत रडत असेल. चिडचिड करत असेल. अन्नसेवन म्हणजे त्याला जर जेवण जात नसेल. तर अशावेळी सुद्धा हा उपाय त्या मुलाला लागलेली नजर किंवा नजर दोष एकादी बाधा असेल. वाईट शक्ती जर त्रास देत असेल.

घरातल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा अगदी वास्तूमध्ये अशा काही चुका घडलेल्या आहेत. की त्यामुळे अनेक वाईट शक्तींचा वास आपल्या अवतीभोवती सातत्याने होत राहतो आणि मग घरामध्ये वादविवादाच नकारात्मक शक्तीचा प्रस्त वाढतो. तर अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करता येतो. नियम अट केवळ एकच आहे.

आपण आपल्या कुलदेवतांची इष्ट देवांची माहिती करून घ्या. त्यांची पूजा दररोज करा आणि आजचा हा उपाय करण्यापूर्वी या उपाया संबंधी अगदी संपूर्ण माहिती घ्या. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि निष्ठेने हा उपाय करा. आणि याची वाच्यता कुठेही करू नका. त्याची जी वाचत आहे. तुम्ही हा उपाय करणार आहे. हे कोणालाही सांगू नका. अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा.

अगदी तुमच्या घरातल्यांना ही सांगितलं नाही तरी सुद्धा चालेल. ज्या व्यक्तीला समस्या आहे. जी व्यक्ती समस्येने ग्रस्त आहे. त्या व्यक्तीने हा उपाय करावा. लहान मुलांच्या बाबतीत अगदी त्या लहान मुलाच्या जवळची व्यक्ती आई असेल वडील असतील आजी आजोबा असतील. तेव्हा जी व्यक्ती त्या लहान मुलावर अतोनात प्रेम करते. त्या व्यक्तीने या लहान मुलाची नजर उतरवण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी हा उपाय जवळची व्यक्ती प्रेमळ व्यक्ती करू शकते.

मात्र या उपायाची वाच्यता करू नका. जे उपाय आम्ही सांगत असतो. हजार वर्षांपासून साधुसंतांनी ऋषीमुनींनी कठोर तपस्या करून हि विद्या प्राप्त केलेली आहे आणि या विद्येचे काही विशिष्ट नियम असतात आणि इतक सखोल आणि सविस्तर सांगण्याचं कारण इतकच आहे. की तुम्हाला त्या नियमांची जाणीव व्हावी. कोणत्याही प्रकारच्या नियमांचं पालन न करता केलेले उपाय.

निष्फळ ठरतात आणि मग आपला आपल्या धर्मशास्त्रांवरचा विश्वास उठतो. तर हा उपाय कधी करावा. दोन तिथि आहेत. एक तिथी आहे आणि एक वार आहे. कोणत्याही रविवारी शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष असो. कोणत्याही रविवारच्या दिवशी आपण हा उपाय करू शकता किंवा अमावस्येच्या तिथीस केलात तर अति उत्तम आहे. अमावस्येच्या तिथीस नकारात्मक शक्ती वरचढ झालेली असतात.

आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्याचा हा सर्वोत्तम दिवस सर्वोत्तम तिथी अमावस्या आहे. नक्की आपण काय करणार. नऊ काळ्या मिरीचे दाणे रविवारी किंवा अमावस्येच्या तिथीस सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून देवपूजा आटोपावी आणि देव पूजा करून झाल्यानंतर आपल्या कुलदेवते समोर किंवा इष्टदेवतेसमोर आपण हे नऊ काळ्या मिरीचे दाणे ठेवायचे आहेत.

ज्या व्यक्तीला समस्या आहे बाधा आहे. त्या व्यक्तींने हा उपाय करा. लहान मुलांच्या बाबतीत त्या लहान मुलाला जी व्यक्ती प्रेम करते. त्या लहान मुलाच्या खूप जवळची आहे. आई-वडील असतील. अशा व्यक्तींनी हा उपाय त्या लहान मुलांसाठी करायचा आहे. नऊ काळ्या मिरीचे दाणे ठेवल्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या कुलदेवता आपल्या इष्ट देवतेस प्रार्थना करायची आहे.

आपल्या जीवनातील या समस्या दूर करण्याची अगदी कोणत्याही समस्या असतील. या समस्या दूर करण्याची प्रार्थना करायची आणि त्यानंतर अगदी संपूर्ण दिवसभर हे नऊ काळ्या मिरीचे दाणे त्याच ठिकाणी इष्टदेवतेसमोर किंवा कुलदेवतेसमोर असणार आहेत. सायंकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा आपण पुन्हा एकदा आपल्या कुलदेवते समोर नतमस्तक व्हायचं आहे.

मनोभावे हात जोडून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आणि हे नऊ काळ्या मिरीचे दाणे आपल्या हातात घ्यायचे आहेत. उजव्या हातात ही घेऊ शकता. डाव्या हातात ही घेऊ शकता घेतल्यानंतर मूठ घट्ट बांधायची आहे. जर लहान मुलांसाठी करताय. तर लहान मुलांच्या डोक्यावरून हे नऊ वेळा फिरवायचे आहे. म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने फिरवा.

आणि नऊ वेळा उलट्या दिशेने फिरवायची आहे. एकदा सुलटे आणि एकदा उलटे नऊ नऊ वेळा वारायचे आहे डोक्यावरून. जर तुम्ही स्वतःसाठी करताय मोठी व्यक्ती आहे. तर त्यांनी स्वतःच्या डोक्यावरून नऊ वेळा सुलटे आणि नऊ वेळा उलटे वारायचे आहे. ही जी वारण्याची क्रिया आहे ही आपल्या वास्तूच्या बाहेर येऊन आपण करायची आहे. तुमच्या घराच्या बाहेर या घराच्या बाहेर आल्यानंतर पूर्व दिशेकडे ज्या दिशेने सूर्य उगवतो.

त्या दिशेकडे पाहत नऊ वेळा सुलटे आणि नऊ वेळा उलटे आपण हे वारायचे आहे. घरात ही क्रिया करू नका आणि अशाप्रकारे वारल्यानंतर या जा काळ्या मिरी आपल्या हातात आहेत. घट्ट मुठ जी आपण बांधलेली आहे. त्यांच्याकडे पाहत आपल्या हाताकडे पाहत आपण प्रार्थना करायची आहे. की आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या नकारात्मक शक्ती बाधा नजर दोष किंवा कोणत्याही प्रकारचे दोष असतील ते निघून जाऊ देत.

अशा प्रकारची प्रार्थना तीन वेळा वारंवार करायची आहे. त्यानंतर “ओम ओम ओम” तीन वेळा म्हणायचं आहे. आणि एक काळ्या मिरीचा दाणा पूर्व दिशेकडे फेकायचा आहे. आपलं तोंड पूर्व दिशेला आहे. पूर्व दिशेकडे पहिला दाना फेकायचा आहे. जितके दूर फेकता येईल फेकून द्या. प्रत्येक दाना फेकताना ओम ओम ओम अशाप्रकारे तीन वेळा ओम चे उच्चारण करायचे आहे. आणि मगच आपण दाना फेकायचा आहे.

या दाण्या सोबत आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या नकारात्मक शक्ती सुद्धा बाहेर पडत आहेत. निघून जात आहेत. अशी मनोमन आपण कल्पना करायची आहे. दुसरा जो दाना आहे. लक्षात घ्या आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. मोकळ्या मैदानात किंवा तुम्ही तुमच्या घराच्या छतावर गेलात तरी चालेल. मात्र शक्यतो घराच्या बाहेर हे नऊ दाणे वारल्यानंतर शक्यतो. घरात प्रवेश करू नका.

तुमच्या घरा बाहेर कुठेही फेकून द्या. काही अडचण नाही. किंवा तुमच्या वास्तूमध्ये या गोष्टी पडता कामा नयेत. पहिला दाना पूर्व दिशेला फेका. दुसरा ईशान्य दिशेला तिसरा उत्तर दिशेला चौथा दाना वायव्य पाचवा पश्चिम सहावा नैऋत्य सातवा दक्षिण आठवा आग्नेय आणि शेवटचा जो दाना आपल्याला फेकायचा आहे. तो आपण आकाशात म्हणजे वरती फेकायचा आहे. फेकल्यानंतर मागे वळून न पाहता थेट आपल्या घरात जायचं आहे.

कोणाशी बोलायचं नाही आहे. हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत. इष्टदेवतेसमोर कुलदेवतेसमोर बसून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आपण हा उपाय केलेला आहे. मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका आणू नका. दुसऱ्या दिवशी आपल्या जीवनातील समस्या या कमी होण्यास प्रारंभ होईल. लहान मुलांची नजर उतरलेली असेल. बाधा टळलेल्या असतील. उद्योग व्यापार व्यवसाय हळू हळू चालू लागेल. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *