नमस्कार, मराठी सिनेमाचा एक अख्खा काळ गाजवलेले अभिनेते म्हणजेच दादा कोंडके. दादांच्या हटके अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनेता प्रथमेश परब याने दादांच्या जुन्या घराला भेट दिली आहे. पण दादांच्या जुन्या घराची अवस्था पाहून त्याने उद्विग्न अवस्थेत त्या घराचा फोटो शेअर केला आहे.
प्रथमेश म्हणतो, सुन्न विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं बे घर दुसरं तिसरं कोणाचं नसून आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके याचं आहे. हे दादांचं राहत घर. हा फोटो जुम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, या राहत्या घराची स्थिती किती दयनीय अवस्था झाली आहे ते!
आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने हाऊसफुलच्या बोर्डाने चित्रपट गृहाची शोभा वाढवली, आपल्या अभिनयाने, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं,
खरचं आज त्या व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं इतकं अवघड आहे का?? प्रश्न अनेक आहेत! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरीत! अशी पोस्ट प्रथमेश परब यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.