बघा महेश कोठारे आणि नीलिमा यांचं कसं जमलं लग्न

नमस्कार, आज पर्यंत अनेक चित्रपट, मालिका यामधून प्रेक्षकांची मन जिंकलेले, धूमधडाका, झपाटलेला, थरथराट, दे दणा दे अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचे नायक आणि निर्माते महेश कोठारे. आज आपण महेश कोठारे यांच्यासाठी लकी ठरलेल्या त्यांच्या पत्नी नीलिमा कोठारे आणि महेश कोठारे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. नीलिमा यांचं माहेरचे नाव नीलिमा देसाई. नीलिमा देसाई यांच्या कुटुंबीयांचा अभिनय क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. महेश कोठारे यांनी ‘ आपला जवान’ या चित्रपटापासून बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. महेश यांनी वकीलीचे शिक्षण घेतले.

शिक्षणानंतर ते पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले. त्यांनी केलेला प्रीत तुझी माझी हा पहिला चित्रपट होता पण या चित्रपटाला देखील फार यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी गुजराती, राजस्थानी चित्रपटात काम केले पण त्यातही त्यांचे तारे चमकले नाहीत. पुढे त्यांचे नीलिमा यांच्यासोबत अरेंज मॅरेज झाले. अगदी काही भेटीतच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यांचं लग्न झाले.

नीलिमा या महेश कोठारे यांच्यासाठी लकी ठरल्या. लग्नानंतर आलेला त्यांचा पहिला चित्रपट लेक चालली सासरला या चित्रपटाला भरघोस यश मिळाले आणि यामध्ये महेश कोठारे यांचा अभिनय वाखाण्याजोगा होता. महेश कोठारे यांचा अभिनय प्रवास अगदी जोमाने चालू झाला. नीलिमा तशा चित्रपट सृष्टीपासून लांबच होत्या. त्यांनी त्यांचा मुलगा आदिनाथ यांच्याकडे लक्ष केंद्रित केले होते.

पछाडलेल्या या चित्रपटापासून त्यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणून कारकीर्द करायला सुरुवात केली. त्यानंतर जय मल्हार या मालिकेसाठी सुध्दा त्यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले होते. महेश कोठारे यांनी आतापर्यंत सुपरहिट चित्रपट केले आहेत. या चित्रपटांच्या पाठीमागे नीलिमा यांचा मोलाचा वाटा आहे आणि महेश कोठारे यांनी दिलेली साथ आहे.

कोठारे फॅमिली चित्रपट निर्मिती आणि मालिकेंच्या निर्मितीमध्ये अव्वल आहे. कोठारे व्हिजन या नावाने अनेक वर्ष ते ही इंडस्ट्रीज चाकवत आहेत. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग आहे. महेश कोठारे यांना त्यांचा पत्नीची उत्तम साथ आहे. महेश कोठारे आणि नीलिमा कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा सुध्दा उत्तम कलाकार आहे.

आणि त्यांच्या पत्नी उर्मिला कोठारे या सुध्दा अनेक मालिका व चित्रपटामध्ये दिसून आल्या आहेत. आणि या दोघांची कन्या जिजा ही सुध्दा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. महेश कोठारे हे अनेक कार्यक्रमांमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये नीलिमा यांची साथ कशा पद्धतीने त्यांना मिळाली हे सांगत असतात. तर महेश कोठारे आणि नीलिमा कोठारे या जोडप्याला असंख्य चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *