जनतेच्या मनातील पंतप्रधान जाणून घ्या नितीन गडकरी यांचा जीवन प्रवास

देशात जेव्हा कधी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं वाटतं. तेव्हा सर्वप्रथम नाव समोर येतं ते म्हणजे भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी यांचं. सध्या कोरोनाच्या काळात माननीय नितीन गडकरी हे अधिकच चर्चेमध्ये आहेत. ते म्हणजे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे आणि त्यांच्या या उत्तम कार्यामुळे. अनेक नागरिकांना ते पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आहे.

सोशल मीडियावर रिलीज केलेल्या अनेक इंटर्व्ह्यूज आणि त्यांच्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नागरिकांना भावी पंतप्रधान श्री नितीन गडकरी असेही म्हणत आहेत. त्यातीलच काही निवडक कमेंट्स आपण बघणार आहोत. “गडकरी साहेब तुमचे योगदान खूप मोठ आहे. नदीजोड प्रकल्प सुरू करा. शेतीशी निगडित व्यवसायाला चालना द्या. भावी पंतप्रधान श्री नितिन गडकरी साहेब महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे.

तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. मराठी माणूस पंतप्रधान म्हणून जर पाहायला आवडेल तर गडकरी साहेब तुम्हीच. मी भाजप समर्थक मुळीच नाही आणि भाजपला सपोर्टही नाही माझा. पण तुमचं काम खूप चांगले आहे सर. गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान बनले पाहिजे. गडकरी साहेब चांगला माणूस आहे. कामाचा माणूस आहे. पंतप्रधान झाले पाहिजे याला म्हणतात.

खरे नेते आणि सुसंवाद. भाजपमधील एकमेव व हुशार माणूस नितीन साहेब गडकरी नितीन जी आपण खूप महान नेते आहात. संकट समयी आपण महाराष्ट्रात धावून येतात. धन्यवाद.” अशा अनेक कमेंट्स माननीय गडकरी साहेबांनी विषयी सोशल मीडियावर येत असतात. देशात आजच्या घडीला सर्वपक्षीय नेते नितीन गडकरी यांना मानतात.

कारण चूक आहे तिथे आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा ते रोखठोकपणे बोलतात आणि त्यांची कान उघडणी करतात. आणि हे करण्यासाठी ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरु झाली. आज आपण नितीनजी गडकरी यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा गावात नितीन गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 रोजी झाला.

लहानपणीच वडील वारल्यामुळे गडकर यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. नितीन जी हे आई आणि बहिणीच्या संस्कारात मोठे झाले. गडकरी यांनी प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातच पूर्ण केलं. तिथे त्यांनी आपली एलएलबी सुद्धा कंप्लिट केली. या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. नितीन गडकरी यांनी आरएसएस मध्ये सुद्धा अगदी सक्रिय काम बजावल आहे.

1981 साली अवघ्या 24 वर्षाचे असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरचे ते शहराध्यक्ष झाले. पुढे कांचन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या दाम्पत्यांना तीन अपत्य आहेत. खरं तर 1989 पासून नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1989 1996 2002 मध्ये आमदारकीच्या निवडणुका जिंकल्यादरम्यानच्या काळात 1995 साली राज्यात यूपी चे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपवण्यात आला.

पैसा नसताना देखील खाजगीकरणातून कामे करण्याचा त्यांनी सपाटाच लावला. नागपूर मुंबईसह राज्यातील 100 हून अधिक उड्डाणपुलांची काम त्यांनी अगदी धडाकेबाज पणे केली. आणि अशी उड्डाणपुलाची मालिकाच उभी केली. गडकरींच्या कारकीर्दीमध्ये मुंबई-पुणे जलद गती मार्गाची निर्मिती झाली. मुंबईतील सर्व उड्डाणपूल रस्ते उभारण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ताकद दिली.

2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आणि गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली. विजन 2025 मुळे पक्षात नवा जोश संचारला. 2014 साली भाजपचे सरकार सत्तेत आले. 16 व्या लोकसभेत नागपूर मतदार संघातून नितीन गडकरी खासदार म्हणून तब्बल 85 हजार मतांच्या फरकाने निवडून आले.

केंद्रात त्यांच्यावर रस्ते वाहतूक जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यापासून भारतीय जनता पक्षाची जनतेला ओळख करून देण्यासाठी नितीन गडकरी यांनी जिवाचे रान केले. प्रचारासाठी भिंती रंगवणे. बैठकीसाठी अगदी सतरंजी उचलन्यापर्यंत ते पाणी वाटपा पर्यंतची छोटी मोठी कामे त्यांनी आजपर्यंत केली आहे. यामध्ये त्यांनी कुठेही कमीपणा मानला नाही.

असे असून सुद्धा साध्या कार्यकर्त्यांची आज काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख आहे. भारत सरकारच्या प्रत्येक कार्यात भविष्याचा वेध नितीनजी यांनी घेतला आहे. जात धर्म पंथ पक्ष असा कोणताही भेदभाव न करता गडकरी यांनी सर्वसामान्यांची कामे केली आहेत. म्हणूनच वैचारिक मतभेद असतानाही या नेत्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. असे विरोधक ही आग्रहाने बोलतात.

एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करण्याची गडकरी यांची तयारी असते. म्हणूनच संपूर्ण भारताला वेगवान बनवणाऱ्या नितीन गडकरी यांना विकासपुरुष म्हणून ओळखलं जातं. देशातल्या अनेक तरुणांना ते पंतप्रधान व्हावेत असं वाटतं. सर्वसामान्यांच्या नेत्याला नितीन गडकरी यांना पुढच्या वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *