जर्नालिझम वीक मध्ये आपण पत्रकारांची माहिती ऐकत आहोत. चला तर मग सुरुवात करुया. सकाळी टीव्ही लावल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंग एबीपी माझा मध्ये आपले स्वागत. हा आवाज गेली बारा वर्षे महाराष्ट्राला खिळवून ठेवतोय. आज पर्यंत आपल्या खास शैलीत महाराष्ट्रातील दिग्गज मांदियाळींच्या जीवनाचे रहस्य उलगडणाऱ्या एबीपी माझा च्या अँकर ज्ञानदा कदम यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे.
ज्ञानदा चे बालपण आर्मीच्या काटेकोर शिस्तीमध्ये गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या गांधी बाल मंदिर हायस्कूलमध्ये झाले. पण घरात आई आजोबा काकू शिक्षक होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. घरातील सर्वांची त्या शिक्षक व्हाव्या अशी इच्छा होती. पण त्यांचा कल मीडिया क्षेत्रात होता. आपला आवाज हीच आपली ताकत आहे.
हे ओळखून अकरावीनंतर व्हॉइस कन्सेंसचा कोर्स केला. 2000 सालच्या दरम्यान आकाशवाणी माध्यमाच्या केंद्रस्थानी होती. त्यामुळे आकाशवाणीला इंटरव्यू दिला आणि मीडिया क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. कधी मागे वळून पाहिलच नाही. मीडियातील स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रिंट मीडियात पाऊल ठेवलं. दैनिक लोकमत दैनिक लोकसत्ता मध्ये रिपोर्टर म्हणून सर्वोत्तम कामगिरी बजावली.
दरम्यानच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झाला. स्टार माझा म्हणजे सध्याचे एबीपी माझा या खासगी न्यूज चॅनेल साठी अर्ज केला. 2007 साली एबीपी माझाला त्या रुजू झाल्या. तेव्हापासून महाराष्ट्राच्या सुखदुःखाच्या वार्ता सांगत. रिपोर्टच्या बातम्यांना न्याय देत. एबीपी माझाचा चेहरा आणि आवाज बनू लागल्या. एबीपीला रिपोर्टर अँकर म्हणून काम करताना.
त्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी रणसंग्राम रणरागिनीचा हा विशेष कार्यक्रम केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवताना महिलांनी व्यवसायात घेतलेली उत्तुंग भरारी महाराष्ट्र समोर आणली. एबीपी माझावर माझा कट्टा मध्ये दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. हुंडाविरोधी आरक्षण माझी शाळा दुष्काळ परिषद महापूर आदी विषयांना अतिशय संवेदनशीलपणे न्याय दिला.
आणि हे विषय हाताळले. त्यांची इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकारांनी दखल घेतली. यांना दोन वेळा न्यूज अंड टेलिव्हिजनचा बेस्ट अँकर म्हणून पुरस्कारही मिळाला. मुद्देसुद प्रश्न आणि गोड आवाजाची महाराष्ट्राला सवय झाली. खरंतर सकाळच्या सत्रात ड्युटी सुरू होते. त्यात दररोज मुंबईच्या गर्दीत लोकलमध्ये घुसून ऑफिस गाठतात. मुंबईचा भयानक पाऊस असेल किंवा राजकीय आंदोलने असतील.
तरीदेखील अगदी वेळेत त्या नेहमी ऑफिसला पोहोचतात आणि कार्यक्रम चालू करतात. एनर्जेटिक परफॉर्मन्स त्यांचा कणखर आवाज आणि तशीच देहबोली यामुळेच या घराघरांमध्ये पोहोचल्या. त्यांचा अँकरिंग आणि सूत्रसंचालन सर्वांना आवडू लागल. एक महिला पत्रकार असून देखील ऑफिसला कोणतीही कारणं न देता वेळेचे महत्व आणि जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांची वाटचाल सुरू आहे. खरंच मिडीयामध्ये येणाऱ्या तरुणींसाठी त्या एक उत्तम उदाहरण आणि प्रेरणादायी स्थान आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.