आज आपण झी मराठी या वाहिनीवर”येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेमध्ये रॉकी नावाची भूमिका साकारणारा अभिनेता त्रियुग मंत्री यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता त्रियुग मंत्री हा प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे.
चला तर मग जाणून घेऊया. अभिनेता त्रियुग मंत्री यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती. अभिनेता त्रियुग मंत्री यांचा जन्म 15 सप्टेंबरला झालेला आहे. अभिनेता त्रियुग मंत्री यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात वर्ष 2010 पासून केली.
“प्ले बॅक” या हिंदी चित्रपटापासून त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनय केला. अभिनयासोबत ते एक व्हॉइस आर्टिस्ट सुद्धा आहेत. जे प्रामुख्याने मूवी डबिंग साठी काम करतात.
अभिनेता त्रियुग मंत्री यांनी वर्ष 2010 मध्ये प्लेबॅक या हिंदी चित्रपटापासून अभिनय करियरची सुरुवात केली होती. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी नगरसेवक एक नायक या मराठी चित्रपटामध्ये सपोर्टिंग ॲक्टरची भूमिका केली होती.
वर्ष 2020 मध्ये त्यांनी अजिंक्य या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री त्रियुग मंत्री यांना मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.
भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या मालिकेमध्ये त्यांनी पंडित चक्रपाणी मिश्रा नावाची भूमिका केली होती. या मालिकेनंतर त्यांनी सोनी टीव्ही वरील संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेमध्ये अभिनय केला होता. या मालिकेनंतर त्यांनी सम्राट अशोक विघ्नहर्ता गणेश यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.
सध्या अभिनेता त्रियुग मंत्री हे झी मराठी या वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये रॉकी नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.