मराठी चित्रपट सृष्टी मधील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री. म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. हिचा 7 मे ला कुणाल बेनोडेकर यांच्याबरोबर विवाह सोहळा पार पडला. अगदी चारच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आणि या विवाह सोहळ्यामुळेच सोनाली चांगलीच चर्चेत आली.
आणि आता पुन्हा एकदा सोनाली सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ते म्हणजे सोनालीच्या हटके फोटोनी तिच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. लग्नानंतर तब्बल दोन महिन्यांनी सोनाली पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. सध्या सोनाली जम्मू येथे आहे. तिथे सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्टच चित्रीकरण करताना दिसत आहे.
या चित्रीकरणासाठी सोनालीने पंजाबी मुलीचा पेहराव केला आहे. सलवार-कमीज आणि ओढणी मधील सोनालीचा देसी लुक भलताच भाव खाऊन गेला. भारत-पाकिस्तान सीमेवर चित्रीकरण करत असलेल्या सोनालीने शेअर केलेले हे फोटो पाहून चाहते. मात्र घायाळ झाले आहेत.
तिने आपला फोटो शेअर करत आपल्या देशाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. सोनालीचे हे फोटो चाहत्यांमध्ये देखील खूप व्हायरल झाले आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.