कशी आहे समांतर 2 ही मराठी वेबसिरीज?

एम एक्स प्लेयर वर समांतर या मराठी वेब सिरीजचा दुसरा पार्ट रिलीज झाला आहे. समांतर वेबसिरीजच्या पहिला पार्टला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता समांतर दोन मध्ये नेमक काय होणार? याचीच सर्व प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. ही वेब सिरीज मी काल पूर्ण बघितली. त्यामुळे ही वेबसिरिज मला कशी वाटली.

त्याबद्दलचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. असं म्हणतात की काही व्यक्तींच्या नशिबाच्या रेषा या समांतर असतात. म्हणजेच एकाच्या नशिबात जे घडलय तसंच काहीस बदलून पण तशाच प्रकारच्या घटना हे दुसऱ्याच्या नशिबात घडत असतात. यावरच ही वेबसिरीस आधारित आहे. यामध्ये कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपानी यांच्या भाग्याच्या रेषा समान आहेत.

पण कुमार महाजन मात्र याविरुद्ध लढा देतोय. नशीब बदलवण्याचा प्रयत्न करतोय. तो यात यशस्वी होतो का? हेच या वेब सिरीज मध्ये दाखवलय. या वेबसीरीज मध्ये कुमार महाजनच पात्र अभिनेता स्वप्निल जोशी तर सुदर्शन चक्र पाणी याचं पात्र अभिनेता रितेश भारद्वाजने साकारलय. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री सई ताम्हणकर.

हे सर्व कलाकार मुख्य भूमीत आहेत. तर इतरही काही मराठी प्रसिद्ध कलाकार या वेबसीरीज मध्ये झळकले. समांतर 2 या वेबसीरिज मध्ये वीस ते तीस मिनिटाचे असे एकूण दहा एपीसोड आहेत. म्हणजेच ही वेबसिरीज पूर्ण पाहायला एकूण पाच तास लागतात. समांतर 2 या वेबसिरीजची सुरुवात मात्र संथ आहे. म्हणजेच स्लो आहे.

यात कुमार महाजनला प्रमोशन मिळाले. कंपनीकडून त्याला गाडी बंगला मिळालाय. त्यामुळे याच सक्सेस तो एन्जॉय करताना दिसतोय. त्याबरोबरच चक्रपाणीची डायरी वाचून तो त्याचे कर्म बदलून भविष्य आणि नशीब बदलण्याचा प्रयत्न देखील करतोय. पण पुढे डायरीत लिहिल्याप्रमाणे कुमारच्या आयुष्यात नवीन बाईची एन्ट्री होते. म्हणजेच सई ताम्हणकरची एन्ट्री होते.

यात सई ताम्हणकरचा डबल रोल आहे. यात सुदर्शन चक्रपाणी यांच्या आयुष्यात आलेली देखील नवीन बाईचा रोल सुद्धा अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेच केला आहे. अभिनेत्री सईच्या एंट्री नंतर ही वेबसिरीस गती पकडते. कुमारच्या आयुष्यात अशा अनेक घडामोडी घडतात की ज्या चक्रपाणीच्या आयुष्यात सुद्धा घडल्या होत्या.

अनेक प्रयत्न करून सुद्धा कुमार स्वतःला त्यातून वाचवू शकला नाही. उलट त्याचे प्रयत्न हे त्या घडामोडी साठी कारणीभूत ठरले आणि पत्नी असून सुद्धा दुसऱ्या बाईच्या आयुष्यात येण्याने सुखाचं जीवन जगत असलेला कुमार हा रस्त्यावर येतो. गाडी बंगला नोकरी पत्नी त्याचा मान सन्मान हे सर्वकाही त्याच्यापासून दूर जातं.

आणि मग यानंतर कुमारचं सुरू होत सुदर्शन चक्रपाणीला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न. मग पुढे सुदर्शन चक्रपाणी हा कुमारला भेटतो का? कुमारला पुन्हा नोकरी मिळते का?त्याची पत्नी त्याच्याकडे पुन्हा परत येते का?आणि ते दुसऱ्या बाईचं म्हणजेच अभिनेत्री सईच काय होतं? आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुमार हा त्याच्या नशिबाला बदलण्यात यशस्वी ठरतो का?

या प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्हाला या वेबसिरीजच्या शेवटपर्यंत मिळतील. पण या वेबसिरिजचा शेवट मात्र निराशाजनक आहे. तो मला फारसा आवडलेला नाही आणि तुमच्यापैकी अनेकांना तो आवडणार सुद्धा नाही. कदाचित समांतर वेबसिरीजचा तिसरा पार्ट येणार असावा म्हणून अशा प्रकारचा शेवट करण्यात आला आहे.

पण समांतरच्या या दुसऱ्या पार्ट मध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर ही मात्र वेगळाच भाव खाऊन जाते. तिची एंट्री या वेबसीरिज मधील आणि कुमारच्या आयुष्यामधील टर्निंग पॉईंट आहे. म्हणजेच समांतर 2 या वेबसिरीज मधील अभिनेत्री सई ताम्हणकर ही महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि हे कसं? आणि का? हे सर्व तुम्हाला वेब सिरीजच्या शेवटी कळेल.

या वेबसीरीज मध्ये काही बोल्ड सीन आहेत आणि अनेक ठिकाणी शिव्या सुद्धा ऐकायला मिळतात. त्यामुळे ही वेब सिरीज संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासाठी नाही आहे. तुम्ही एकटे किंवा मित्रांसोबत ही बेबसिरीज पाहू शकता. तर आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही वेब सिरीज पहावी का? तर खूप भारी अशा प्रकारची ही वेबसिरीज मला वाटली नाही.

म्हणजेच ही वेब सिरीज मला ठीकठाक वाटली. पण आपले मराठी कलाकार आहेत आणि त्यात ही मराठी मधील सर्वाधिक प्रसिद्ध अशी वेबसिरीज आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या वेबसीरिज मध्ये झळकत आहेत. म्हणून ही वेब सिरीज पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि याच कारणासाठी तुम्ही ती पाहू शकता. पण समांतर 2 या वेबसिरीजच्या शेवटी मात्र तुम्हाला हॅप्पी एंडिंगचा आनंद मिळणार नाहीये.

म्हणजेच निराशाच मिळणार आहेत. त्यामुळे या रिव्ह्यूवरून ही वेब सिरीज पाहायची की नाही हे तुम्हीच ठरवा. मला समांतरच्या दुसऱ्या पार्ट पेक्षा पहिला पार्ट अधिक चांगला वाटला. तर आता देऊया रेटिंग. तर माझ्या रिव्ह्यू नुसार मी या वेब सिरीजला पाच पैकी तीन स्टार देतोय. तर हा होता या वेब सिरीज चा रिव्ह्यु.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *