प्रत्येक घरात सत्यनारायण कथा आयोजित केली जाते. सत्यनारायण कथा काय आहे आणि कथा करण्यामागील कारण काय हे जाणून घ्या –
- भगवान सत्यनारायणाच्या पूजेमध्ये खास करून केळीची पाने, नारळ, पंचफळ, पंचमृत, पंचगव्य, सुपारी, विड्याची पानं, तीळ, मोली, रोली, कुमकुम, तुळशी आवश्यक असतात. त्यांना प्रसाद म्हणून फळे, मिठाई आणि पांजरी अर्पण करतात.
- उपवास व कथा ऐकून एखाद्याच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. ही कथा कुटुंबात अन्न, धन, सम्पन्नता आणि आपसात प्रेम व शांतीसाठी केली जाते. ही कथा गृहस्थ जीवनासाठी आवश्यक आणि शुभ मानली जाते. लग्नानंतर, संतान प्राप्तीनंतर आणि नवीन घरात प्रवेश केल्यावर या कथेचं आयोजन आवश्यक केलं जातं.
- सत्यनारायण कथेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये छोट्या कथांच्या माध्यमातून सांगितले आहे की आपण सत्याचा अवलंब न केल्यास कोणती समस्या उद्भवते आणि कशाप्रकारे प्रभु नाराज होऊन शिक्षा देतात आणि प्रसन्न होऊन बक्षीस देतात हे या कथेचं केंद्र बिंदु आहे.
- नारायणच्या रूपाने सत्याची उपासना करणे आणि नारायण यांना सत्य मानणे, हे सत्यनारायण आहे. सत्य यात संपूर्ण जग समाहित आहे इतर सर्व माया आहे.
- सत्यनारायण व्रत कथेचे दोन भाग आहेत – व्रत-उपासना आणि कथा ऐकणे किंवा पाठ करणे.
- या कथेत दोन मुख्य विषय आहेत – संकल्प विसरणे आणि प्रसादाचा अपमान करणे.
- ही कहाणी बर्याचदा कुटुंबात पौर्णिमेच्या दिवशी, गुरुवारी किंवा विशेष सणानिमित्त आयोजित केली जाते.
- या कथेचा तिरस्कार किंवा उपहास एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणींना सुरुवात करतं.
- सत्यनारायण व्रत कथा ही भगवान विष्णूच्या वास्तविक स्वरूपाची कहाणी आहे.
- सत्यनारायण व्रत कथा स्कंद पुराणातील रेवाखंड येथून संकलित केली आहे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.