चेहऱ्यावर बर्फाची मालिश केल्याचे फायदे जाणून घ्या

उन्हाळ्याच्या मौसमात त्वचेची उष्णता वाढते,पुळ्या,मुरूम होण्या सारख्या समस्या उद्भवतात.या हंगामात चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाची मॉलिश करणे प्रभावी ठरू शकते.

या साठी आपल्याला बर्फाला एखाद्या कपड्यात किंवा प्लास्टिकच्या बॅगेत गुंडाळून चेहऱ्यावर लावायचे आहे.चला जाणून घेऊ या की चेहऱ्यावर दररोज 10 मिनिटाची मॉलिश केल्याने काय फायदे मिळतात.

1 कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळे सुजतात.डोळ्याची सूज घालविण्यासाठी डोळ्यांवर बर्फाची मॉलिश करा,असं केल्याने डोळ्याला थंडावा मिळेल आणि आपल्याला फ्रेश वाटेल.डोळ्याचा थकवा देखील दूर होईल.

2 बर्फाने चेहऱ्यावर मॉलिश नियमितपणे केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या देखील लवकर पडत नाही.

3 बर्फाची मॉलिश केल्याने रक्तविसरण चांगले होत,या मुळे आपण दीर्घकाळापर्यंत तरुण दिसाल.

4 बर्फाची मॉलिश केल्याने मुरुमांपासून सुटका मिळते.सर्वप्रथम आपला चेहरा धुवून कोरडा करा.आता कपड्यात किंवा प्लास्टिक बॅगेत गुंडाळलेल्या बर्फाने आपल्या हाताला वर्तुळाकार फिरवत चेहऱ्याची 10 मिनिटे मॉलिश करा.असं दररोज केल्याने मुरुमांपासून सुटका मिळते.

5 चेहऱ्यावर मेकअप करण्याच्या पूर्वी जर चेहऱ्याची बर्फाने मॉलिश केली तर हे प्रायमरचे काम करतो.आणि आपले मेकअप जास्तकाळ टिकेल.

6 सनबर्न किंवा त्वचेची टॅनिग झाली असल्यास टॅनिग काढून टाकण्यात बर्फाची मॉलिश केल्याने मदत होते.

7 शरीराच्या कोणत्याही भागात सूज आली असल्यास त्यात ही आराम मिळतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *