घर मोठे असो किंवा लहान परंतु प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच. देवघरासाठी एक वेगळी जागा काढलेली असते. मग देवघरात हे ज्याच्या त्याच्या भक्तीने आवडीने व परंपरेने देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवत असतात. आपल्या देवघरात परंपरेने आलेले आपले वाडवडिलांपासून चालत आलेले देवी-देवतांचे चांदीचे तर काही ठिकाणी सोन्याची टाक असतात.
मग आपण इतर देवदेवतांच्या पितळी मूर्ती देवघरात ठेवून त्यांची पूजा करतो. एखादा ठिकाणी आपण गेलो. तर आपल्याला तेथील देवी-देवतांची मूर्ती तुला फोटो आवडला तर तोही आणून आपण त्याची स्थापना देवघरात करतो. अशा प्रकारे आपले देवघर हे विविध प्रकारच्या देवी-देवतांचे भरून जाते.
आपल्या देवघरात महादेवाची पिंड किंवा फोटो असतो. देवघरात महादेवाची पिंड कशी असावी. त्यांचे पूजन कसे करावे. देवघरात पूजा दरम्यान कोणत्या चुका टाळाव्यात. हे सर्व पाहणार आहोत. घरातील देवघरात महादेवाची पिंड ठेवावी. मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवू नये. देवघरातील पिंडीवर नाग नसावा. तसेच नंदीही नसावा.
पिंड एकटीच असावी पिंड साधी दगडी असली तरी चालते. मात्र शक्यतो पितळेची पिंड असावी. देवघरातील पिंड तीन इंचा पेक्षा मोठी असू नये. ते तीन इंचापेक्षा छोटी असावी. कारण मोठी पिंड असेल तर त्याचे पूजनही त्याप्रमाणे करावे लागते. भगवान महादेव हे देवाधी देव असून ते न्यायप्रिय दैवत आहेत. आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहे.
जसे देव-दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच्च आणि इतरही अनेक युनी महादेवाच भजतात. आणि जिथे महादेवाची मूर्ती किंवा फोटो असतो. तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात. म्हणून कधीही देवघरात पिंड ठेवावी. मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाही. तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात.
कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रुपाने उपस्थित असतात. तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वहात असते. ते ओलांडून घेण्याचे पातक लागते. महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते. देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी. मानवाला पिंड पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्ती पीठांवरील महादेवाची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली दिसते.
12 ज्योतिर्लिंग हे लिंग रूपाने आहेत. यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्र सूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवांना जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवांना जल अर्पण केल्यास हे त्याच्यावर खूप प्रसन्न होतात. महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते.
गुरुचरित्रात असे म्हटले आहे. की त्याच्या राज्याभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते. आणि अकाली मृत्यू मिळतो. श्रीमद्भगवत यामध्येम्हटले आहे की महादेवांचे नित्य नियमित सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते. आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रेय राहते. आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र त्यांची कीर्ती पसरते.
भगवान शंकरांनी विषयी थोडी काळजी बाळगणे महत्त्वाची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही अशा गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना वर्ज आहेत. त्या गोष्टी कधी भगवान शंकरांना अर्पण करू नये. तर जाणून घेऊ द्या त्या कोणत्या गोष्टी आहेत.
ते शंख शिव पुराणानुसार भगवान शंकरांनी शांख्चुर नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. परंतु शंखाने महादेवाचे पूजन कधीही केले जात नाही. हळद आणि कुंकू भगवान शंकर आजन्म वैराग्य होते. त्यामुळे शृगरासंबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केले जात नाही.
हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात. तुळशीचे पान असुरचा राजा जालंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे म्हणून गेली होती. भगवान शंकरांनी जलांधराचा वाढ केला होता.
त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता. म्हणून भगवान शंकरांच्या पूजनात तुळशी पत्राचा वापर करू नये. नारळाचे पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केल्या जातो.
परंतु भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते. उकलेले दूध उखलेले दूध किंवा बाजारात मिळणाऱ्या पॅकेट मधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करु नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करावा. बाजारात मिळणाऱ्या पॅकेट मधील उखलेले असते. त्यामुळे भगवान शंकरांना कच्चे दूध अर्पण करावे.
केवढ्याचे फूल भगवान शंकरांच्या पूजे केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णू यांच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवढ्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता. त्यामुळे त्यांच्या पूजनात केवड्याचे फूल निषिद्ध आहे. कुंकू किंवा शेंदूर कुंकु किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यास व वर्ज केलेला आहे. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की महादेवाची पिंड देवघरात कसे ठेवावे व महादेवाचे पूजन करताना काय करावे तसेच काय करू नये ते.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.