शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि अनेक शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन शेळीपालन त्याचबरोबर दुग्ध व्यवसायासाठी म्हशी पालन करतात. आणि त्याच बरोबर काही लोक आवड म्हणून घोडा सुद्धा पाळतात.
पण या सर्व जनावरांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. गावामध्ये याच जनावरांचा आठवडी बाजार सुद्धा असतो. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात हा बाजार चालायचा. पंचक्रोशीतून या बाजारात जनावर यायची. आणि त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री व्हायची.
आज आपण पाहणार आहोत म्हशीची शिंग ही कशा पद्धतीने कापली जातात. आणि त्याची निगा कशी राखली जाते. या शिंगाला एक विशिष्ट असा आकार दिला जातो. त्याच बरोबर ते तासून बारीक केलं जातं आणि अशा पद्धतीने सुंदर अशी ही शिंग दिसतात.
पण म्हशीच्या शिंगाची काळजी घेणे का गरजेच आहे? प्राण्याची शिंग वेडीवाकडी वाढतात आणि ती गोठ्या मधील इतर जनावरांना इजा करू शकतात. त्याचबरोबर म्हैस विकताना ती व्यवस्थित नीटनेटकी आणि स्वच्छ दिसावी. यासाठीच ही शिंग कापली जातात.
त्याच बरोबर ती तासून त्याला रंगही लावला जातो. आणि त्यामागे आणखीन एक कारण आहे. ते म्हणजे म्हशीचं वय कमी दिसतं. त्यामुळेच ती बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर आकर्षक दिसते.
अशाच पद्धतीने घोड्यांची ही निगा राखली जाते. घोड्याला व्यवस्थित चालता याव. त्याच बरोबर टापांचा आवाज व्हावा. यासाठी ही नाल घोड्याला लावली जाते लावली जाते.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.