स्टार प्रवाह वरील अनेक प्रसिद्ध कलाकार असणारी मालिका. ती म्हणजे “सांग तू आहेस का?” यात सिद्धार्थ चांदेकर शिवानी रांगोळे सुलेखा तळवळकर असे अनेक प्रसिद्ध मराठी कलाकार झळकत आहेत.
तर नवोदित अभिनेत्री सानिका चौधरी हिला सुद्धा या मालिकेतील भुताच्या रूपात खूप प्रसिद्धी मिळाली. सांग तू आहेस का? ही मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. पण आता ही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जातय.
कारण स्टार प्रवाह वर 26 जुलै पासून “जय भवानी जय शिवाजी” ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा असणारी नवीन मालिका सुरू होते आणि या नवीन मालिकेची वेळ सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता असेल.
त्यामुळे सांग तू आहेस का? ही मालिका बंद होऊन त्या जागेवर आता जय भवानी जय शिवाजी ही नवीन मालिका सुरू होणार असल्याचं म्हटल जातय. पण अजून स्टार प्रवाहने ही बातमी कन्फर्म केली नाही. लवकरच या विषयी अपडेट देण्यात येईल.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.