लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा फटका आणि टीआरपी कमी या दोन्ही कारणांमुळे काही मालिका बंद करण्यात आल्या आहेत. तर जाणून घेऊयात नेमक्या कोणकोणत्या मालिकांचा यामध्ये समावेश आहे.
कलर्स मराठी वरील “सख्खे शेजारी” हा कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या कार्यक्रमाचे चित्रीकरण आऊटडोअर करावे लागणार होते. पण महाराष्ट्र सरकारने आऊटडोअर शूटिंगला परवानगी न दिल्यामुळे हा शो बंद करावा लागला. अभिनेता चिन्मय उदगीरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होता.
नंबर दोन वर आहे. सोनी मराठी वरील “चांदणे शिंपीत जाशी” ही मालिका. ही मालिका 97 एपिसोड नंतर बंद करण्यात आली. याचं कारण म्हणजे या मालिकेला प्रेक्षकांची जराही पसंती मिळत नव्हती. या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे तर अभिनेता सचेत पाटील यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
सोनी मराठी वरील “श्रीमंत घरची सून” ही मालिका अथर्व आणि अनन्या या भूमिकेच्या प्रेमकथेवर आधारित होती. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती न मिळाल्यामुळे मालिकेचा टीआरपी खूपच कमी आला. यामुळे ही मालिका देखील बंद करण्यात आली. तसेच झी मराठीवरील “काय घडलं त्या रात्री?”
यामध्ये बरेच कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. अभिनेत्री मानसी साळवीने प्रमुख भूमिका साकारली होती. लॉक डाऊनच्या काळात या मालिकेचे चित्रीकरण बंद करण्यात आले. त्याचबरोबर या मालिकेला टिआरपी देखील खूपच कमी मिळत होता. या मालिकेच्या बऱ्याच भागाचे चित्रीकरण हे आउटडोअर होते.
आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे ही मालिका देखील बंद करण्यात आली. सोनी मराठीवरील “सावित्रीजोती” या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत नव्हती. त्यामुळे टिआरपी देखील कमी मिळत होता आणि म्हणून नाविलाज आणि निर्मात्यांनी देखील ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.
स्टार प्रवाह वरील “दख्खनचा राजा जोतिबा” या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. परंतु लॉक डाऊनमुळे ही मालिका बंद करावी लागली. महाराष्ट्रात शूटिंगसाठी बंदी होती आणि या मालिकेचा सेट राज्याबाहेर हलवन शक्य नव्हतं. त्यामुळे ही मालिका निर्मात्यांना बंद करावी लागली.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.