कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत सोशल मीडिया अकाउंटवर काही ना काही नवं पोस्ट करत असतात. कधी आगामी प्रोजेक्टची बातमी तर कधी हटके अंदाजातील आपले फोटो ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
नुकतेच स्मॉल स्क्रीन वरील “माझा होशील ना” मालिकेतील सई हिने काही इंस्टाग्राम वर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर शोभून दिसेल अशी डिझायनर ज्वेलरी घातली आहे.
सई अर्थात गौतमी देशपांडेचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे. त्यातील खास फॅन्ससाठी सईने हे फोटो शूट केले आहे. सईला नऊवारीच्या पेहरावावर पाहून अनेकांनी तिला लवकर लग्न करून टाक असा सल्ला देखील द्यायला सुरुवात केली.
अनेकांनी या फोटोला पसंती दर्शविली आहे. तिच्या या फोटोंची सध्या इंस्टाग्रामवर चांगलीच हवा पहायला मिळते. माझा होशील ना मालिकेमुळे गौतमी घराघरात पोहोचली. या मालिकेतील सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.