नमस्कार मित्रांनो, शकुन शास्त्रात सर्व प्राणी पक्षी व जीवजंतू विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे कोणत्या प्राण्याचे, पक्षांचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात त्यांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो या विषयी संपूर्ण माहिती यात दिलेली आहे. प्रत्येक प्राण्या पक्षांच्या व जीव जंतूंच्या वर्तनाचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो.
जसे गाय, कुत्रा, मुंग्या, पाल, मुंगूस अशा कितीतरी गोष्टींचा आपल्या जीवनावर कळत-नकळत प्रभाव पडतो परंतु आपल्या लक्षात येत नाही आज आपण कावळा हा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो. त्याच्या कोणत्या वर्तनातून काय संकेत असतो हे सर्व जाणून घेणार आहोत दरात जर कावळा येऊन सारखा ओरडत असेल तर.
हा आपल्या घरी पाहुणे येणार असल्याचा संकेत आहे असे आपण फार पूर्वीपासून म्हणतो. अशाच काही वेगवेगळ्या संकेत बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात कावळा दिसणे अशुभ मानले जाते स्वप्नात कावळा काव काव करीत करीत असेल पंख फडफडवत असेल किंवा खात असेल कोणत्याही प्रकारे कावळा स्वप्नात दिसणे.
अशुभ असते हा वाईट घटनेचा संकेत आहे परंतु खरोखर जर कावळा आपल्या समोर येऊन त्याचे डोके खाजवत असेल तर हा आपल्या इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्याचा संकेत आहे आपण जे कार्य करीत आहोत. ते पूर्णत्वास जाईल असा याचा अर्थ होतो कधी कधी आपण काही पोळीचा तुकडा कावळ्यांना टाकतो व कावळे जमा होऊन हे खायला सुरुवात करतात.
ते खूप शुभ असते यामुळे आपली कार्यसिद्धी होते म्हणूनच आपले पूर्वज आपल्याला कावळ्यांना काहीतरी खायला द्यावे असे म्हणत असत. जर कोठे पाण्याचा माठ किंवा पाण्याचे भांडे ठेवलेले असेल आणि जर आपल्या समोर कावळा त्यातील पाणी पीत असेल तर हा एक शुभ संकेत आहे की तुम्ही जर कोर्टात काही केस लढत असाल तर त्यात तुमचा विजय नक्कीच होईल.
किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर तुम्हाला नक्की यश मिळेल त्याशिवाय अनपेक्षितपणे तुम्हाला धनलाभ ही होईल एखाद्या वेळी एखादा कावळा आपणासमोर मा उसाचा तुकडा तोंडात घेऊन जाताना दिसतो. हा सुद्धा एक शुभ संकेत आहे ते आपल्याला धनलाभाचे योग्य बनत आहे आणि जर तोंडात एखादे फूल किंवा पान घेऊन जाताना कावळा दिसला तर.
हा आपल्या मनोकामना सिद्धि व कार्य सिद्धी चा योग असतो. कधी जर एखादा कावळा वाळलेल्या झाडावर बसलेला दिसला. तर हा एक अशुभ संकेत आहे यामुळे आपल्याला आजारपणाचे संकेत मिळतात तुटलेल्या वाळलेल्या झाडाच्या फांदीवर कावळा दिसल्या आपल्याला तुरुंगवासही होऊ शकतो कोर्टकचेरी मागे लागते.
कधी जर कोळशाच्या ढिगाऱ्यावर किंवा राखेच्या ढिगार्यात वर कावळा बसलेला दिसला. तर हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे यामुळे आपण खूप मोठ्या अडचणी फसू शकतो खूप मोठे संकट आपल्यावर कोसळण्याचे हे संकेत आहेत कावळा जर कधी आळोखेपिळोखे घेताना पंख फिरवताना आपल्याला दिसला तर हा एक मृत्यु संकेत आहे.
आपले कोणीतरी प्रियजन आवडती व्यक्ती च्या मृत्यूचा हा संकेत आहे यामुळे वाईट घटना घडू शकते जर कावळ्याने आपल्या अंगावर वीट केले तर आपण म्हणतो की लाभ होईल परंतु हा एक अशुभ संकेत आहे यामुळे आपल्याला शारीरिक कष्ट होतील. मनाचे संतुलन बिघडेल घरात व समाजात आपली नाचक्की होईल.
जर कावळ्याने आपल्या डोक्यावर चोच मारली किंवा पंजा मारला तर यामुळे आजार पण येते आपली धनहानी होते व्यापारात नुकसान होते कधीकधी गॅलरीत टेरेस वर चार पाच किंवा त्यापेक्षा जास्त कावळे जमा होऊन. विनाकारण काव काव करायला लागले आपण त्यांना काही खायलाही टाकलेले नाही आपण त्यांना त्रासही दिला नाही तरीही कावळे ओरडत असतील तर.
हा आपल्या घरातील मुख्य सदस्यांवर खूप मोठे संकट येण्याचा चा संकेत आहे यामुळे घरातल्या मुख्य सदस्य अडचणीत येऊ शकतो. व खूप मोठ्या संकटांना चा सामना त्याला करावा लागू शकतो जर गल्लीतल्या किंवा गावातल्या मुख्य ठिकाणी कावळे जमा होऊन काव काव करत असतील तर असे समजावे की आपल्या गावावर किंवा गल्ली वर मोठे संकट येऊ शकते.
जर आपण कुठे जात आहोत आणि कावळा पाणी पिताना दिसला तर हा धनलाभचा संकेत आहे आपण ज्या कार्यासाठी घराबाहेर पडलो आहोत ते कार्य यशस्वीपणे पूर्ण होण्याचा हा संकेत आहे कावळ्याला आपण आपले पित्र ही मानतो. आणि कावळा हा शनिदेवाचे वाहन ही आहे म्हणून जर आपल्या जीवनात काही कष्ट असतील त्रास असतील तर दररोज कावळ्याला काहीतरी खायला द्यावे.
यामुळे आपल्या कष्ट व बाधांचे निवारण होते म्हणून शक्यतो कावळा आपल्या समोर काही खाईल. अशी व्यवस्था करावी यामुळे आपल्याला धनलाभ तर होतोच त्याशिवाय आपल्या त्रास अडचणी व संकटांपासून ही आपल्याला मुक्ती मिळते.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.