आज आपण एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत. जिने खूपच कमी कालावधीमध्ये मराठी चित्रसृष्टी मध्ये आपली एक वेगळी ओळख बनवलेली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी खूपच कमी कालावधी मध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर बनवलेले आहे.
आपण बोलत आहोत गिरीजा प्रभू यांच्या बद्दल. चला तर मग जाणून घेऊयात गिरीजा प्रभू यांच्या विषयी थोडीशी माहिती. तर या गोष्टीची सुरुवात होते 27 नोव्हेंबर 2000 मध्ये जेव्हा गिरिजा प्रभू यांचा जन्म गोव्यामध्ये झाला.
सध्या त्यांचे वय 20 वर्ष आहे. त्यांची उंची पाच फूट दोन इंच आहे आणि त्यांचे वजन 55 किलो आहे. त्यांच्या डोळ्यांचा कलर ब्लॅक आहे आणि त्यांच्या केसांचा कलर सुद्धा ब्लॅक आहे. गिरिजा प्रभू यांच्या वडिलांचे नाव गिरीश प्रभू आईचे नाव तनुजा प्रभू आणि भावाचे नाव गौरव प्रभू असे आहे.
गोव्यामध्ये जन्मलेल्या गिरिजाने आपले शालेय शिक्षण पीडीईए इंग्लिश मिडीयम मधून पूर्ण केली आहे. तसेच त्यांनी आपले ग्रॅज्युएशन आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक्टिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले. आणि 2018 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले.
2018 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट “काय झालं कळेना” या चित्रपटापासून त्यांनी मराठी सृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बरेच सिनेमे केले त्यामध्ये प्रामुख्याने तुझा दुरावा डॅड चिअर्स कौल मनाचा या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.
तसेच त्यांनी युवा डान्सिंग क्वीन या रियालिटी शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. सध्या गिरीजा स्टार प्रवाह या वाहिनी वरील “सुख म्हणजे नक्की काय असतं” या सिरीयल मध्ये काम करत आहे. चला तर जाणून घेऊया गिरीजा प्रभू यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.
गिरिजा प्रभू यांची फेवरेट एक्ट्रेस आलिया भट आहे. तसेच त्यांचा फेवरेट ऍक्टर वरून धवन आहे. त्यांचा फेवरेट कलर रेड आणि ब्ल्यू आहे. त्यांची फेवरेट मूव्ही कभी खुशी कभी गम आहे. त्यांची बेस्ट फ्रेंड गायत्री दातार आहे. तर ही होती गिरीजा प्रभू यांच्या विषयी थोडीशी माहिती.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.