देव माणूस या मालिकेमध्ये एसीपी दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान हिची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. म्हणजेच तिचं पात्र आता संपुष्टात येणार आहे.
देव माणूस या मालिकेत एसीपी दिव्याने अखेरकार डॉक्टर अजित उर्फ देवीसिंगला पकडले असून त्याला कठोर शिक्षा व्हावी. म्हणून कोर्टात सादर केले आहे. यात वकील आर्या देशमुखची ही तिला साथ मिळाली.
या मालिकेत आर्या देशमुखची भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील या साकारत आहेत. या दोघीही अनेक प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर अजितचे गुन्हे सिद्ध करण्यात यशस्वी ठरत आहेत.
यानंतर आता महाराष्ट्र टाइम्स ने दिलेल्या माहितीनुसार एसीपी दिव्य सिंगच्या जागेवर आता इन्स्पेक्टर शिंदे या केसचा तपास करणार आहेत. म्हणजेच एसीपी दिव्या सिंगला या केस मधून हटवलं जाईल.
या कारणामुळेच अभिनेत्री नेहा खान हिची या मालिकेतून एक्झिट होत आहे. पण प्रेक्षकांनी मात्र याच्यावर नाराजी व्यक्त केली. प्रेक्षकांना अभिनेत्री नेहा खानची या मालिकेतील भूमिका खूप आवडली होती.
त्यामुळेच पुढेही ती या मालिकेत रहावी. अशी प्रेक्षकांची इच्छा होती. पण देव माणूस या मालिकेच्या कहाणीत आता पुढे एक नवीन ट्विस्ट येतोय. त्यामुळेच अभिनेत्री नेहा खानची या मालिकेतून एक्झिट होत आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.