“सुख म्हणजे नक्की काय असतं” या लोकप्रिय मालिकेत मल्हारचे पात्र साकारणारा अभिनेता कपिल होनराव हा गेले तीन महिने खूप भयानक संकटात सापडला होता. त्याच्या वडिलांना अगोदर कोरोना झाला आणि मग ब्लॅक फंगस हा आजार झाला. यामुळे वडिलांची वाचण्याची शक्यता फार कमी होती.
अशा प्रकारचा भयानक अनुभव अभिनेता कपिलने फादर्स डे निमित्त सोशल मीडिया वरती शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले की “हॅप्पी फादर्स डे पप्पा” हा फादर्स डे खरच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. गेली तीन महिने खूप भयानक होती. तुम्हाला झालेला कोरोना त्यातून तुम्ही बरे झालात.
पण घरी आल्यानंतर एक वेगळाच त्रास तुम्हाला सुरू झाला. मी माझ्या शूटिंगमुळे भेटायला येऊ शकलो नाही. पण यानंतर म्युकोर मायकोसिस या नावाचा रोग असतो. हे ही आपल्याला माहीत नव्हते. त्याचा त्रास तुम्ही सात दिवस घरी सहन करत होतात.
तेव्हा मी हैदराबादला हॉस्पिटल मध्ये तुम्हाला भेटल्यावर स्वतः डोळ्याने पाहिल्यावर समजल तुमचं वय. त्यात कोरोनामुळे लंग्सवर झालेला परिणाम. दोन्ही डोळ्यावर आलेली भयानक सुज. त्यात सतत कमी होणार तुमचं ऑक्सिजन लेवल.
वाढणारी शुगर लेवल आणि सर्जरी करण्याच्या आधी डॉक्टरने फक्त 30% वाचण्याचे चान्स आहेत हे शब्द. त्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचे पाच तास. सगळंच संपलं म्हणून सुन्न झालेला मी. पण त्यावर सुद्धा जी फाईटींग स्पिरिट तुम्ही दाखवलीत.
फक्त कोरोनाच नाही. तर ब्लॅक फंगसला पण तुम्ही हरवल आणि हा तुम्ही पूर्ण बरे झाल्यावर त्या रोगाची नाव आपल्याला समजले. हा तो रोग ब्लॅक फंगस म्यू्कोर मायकोसिस होता. तर “यू आर ट्रू फायटर अण्णा”
अशाप्रकारे अभिनेता कपिलने त्याला आलेला तो सरळ भयानक अनुभव आणि त्याच्या वडिलांनी या आजारावर कशी मात केली हे सर्व शेयर केले आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.