महाराष्ट्रात असा एकमेव आमदार आहे जो कोविड सेंटर नुसत उभा करत नाही. तर तिथे असणाऱ्या रुग्णांसमवेत जेवतो. त्यांच्यासोबत झोपतो सुद्धा. आपल्या कुटुंबाप्रमाणे जनसामान्य रूग्णांची सेवा करतो. असा सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणजे पारनेरचे निलेश लंके. जनसामान्यांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून देण्याचे काम आमदार निलेश लंके सध्या करत आहेत.
आज आपण पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती जाणून घेणार आहोत. निलेश लंके यांचा जन्म अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील हंगा या गावात 10 मार्च 1980 साली झाला. त्यांचे वडील ज्ञानदेव लंके सेवानिवृत्त शिक्षक आणि आई शकुंतला लंके या गृहिणी आहेत. निलेश यांचे बालपणीचे शिक्षण हंगा येथे झाले.
तर कॉलेजचे शिक्षण पारनेर येथे पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा होता. तेव्हापासूनच ते हंगा गावच्या राजकारणात लक्ष देऊ लागले. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना एका कंपनीत नोकरी करावी लागली.
मात्र समाजकारणाचा ध्यास असल्यामुळे निलेश लंके यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. म्हणूनच त्यांनी गावातील स्टॅंडवर हॉटेल सुरू केली. मात्र परोपकाराचा स्वभाव असल्यामुळे ते हॉटेल सुद्धा जास्त दिवस चाललं नाही. पुढे त्यांनी शिवसेनेच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
सेनेने त्यांना पारनेर तालुका प्रमुख केले. 2010 सली निलेश लंके यांनी हंगा गावच्या ग्रामपंचायतीत स्वतःच पॅनल लावलं आणि सरपंच पदही मिळवलं गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांनी गोरगरिबांना शासनाच्या योजना समजावून सांगण. त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तरुणांच्या हाताला काम देण.
यांसारखी अनेक काम केली त्यांच्या या कार्यामुळे 2012 साली पंचायत समिती 2017 ला जिल्हा परिषदेतून त्यांच्या पत्नी राणी निलेश लंके यांना निवडून दिलं. 2019 साली शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे निलेश लंके यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं. मात्र तेव्हाही जराही खचून न जाता आपले काम सुरूच ठेवले.
तेव्हा पारनेर नगर विधानसभेच्या रणसंग्रामात शरद पवार यांनी हा हिरा पारखून लंकेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. या निवडणुकीत तब्बल तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेनेचा विजय अवटी यांचा लंकेश यांनी साठ हजार मतांनी पराभव केला. तेव्हा पासून निलेश लंके यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली.
कोरोना महामारीच संकट महाराष्ट्रासमोर पुन्हा एकदा उभ ठाकले. अशा संकटात अहमदनगरला आमदार निलेश लंके दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या नावाने कोवीड सेंटर सुरू केले. पारनेर तालुक्यातील फाळोणी येथे तब्बल दोन हजार शंभर खाटांच सेंटर उभारण्यात आल आहे. यामध्ये 100 ऑक्सिजन बेड आहेत.
विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्याप्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. फाळोणी कोविड सेंटर मध्ये रुग्णांना उत्तम सोयी देण्याबरोबरच मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम सुद्धा सादर केले जातात. राज्यात एकीकडे बेड औषधे मिळत नसल्यामुळे माणसं मरत असताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जीवाची बाजी लावत रुग्णांच्या बचावासाठी देवदूत म्हणून पुढे आलेले आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.