अभिनेता अशोक सराफ आणि नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी मधील दिग्गज अभिनेते आहेत. पण त्याचबरोबर दोघांचीही खर्या आयुष्यात चांगली मैत्री सुद्धा आहे. यांच्या सुरुवातीच्या काळातील मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात.
यापैकी असाच एक किस्सा जो अभिनेता अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. तो म्हणजे अशोक सराफ यांना लोक मारायला आलेले असताना नाना पाटेकर यांनी त्यांचा जीव वाचवला होता. अशा प्रकारचा एक किस्सा त्यांनी या मुलाखतीत सांगितला आहे.
यामध्ये अशोक सराफ यांनी असे सांगितले आहे की एका नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याने लोक अक्षरशा मला मारण्यासाठी धावले होते. त्यावेळी थिएटरच्या मागच्या बाजूने गटारीतून उडी मारून आम्ही पळालो होतो.
मला पकडून नाना धावला होता. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी नाना नसता तर काय झाले असते. याचा विचार देखील मला करवत नाही. अशाप्रकारे नाना पाटेकर यांच्यामुळे जीव वाचल्याचा खुलासा अभिनेता अशोक सराफ यांनी केला आहे.
अभिनेता नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांनी आज पर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ते त्यांच्या अभिनयासाठी संपूर्ण देशभरामध्ये ओळखले जातात. पण त्याचबरोबर ते त्यांच्या मैत्रीसाठी सुद्धा ओळखले जातात.
अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात दोघेही नाटकांमध्ये काम करत असताना अनिता बाई ची कोटिया नाटकासाठी या दोघांनीही जवळजवळ आठ महिने एकमेकांसोबत काम केलं होतं आणि याच दरम्यान त्या दोघांची एकमेकांशी चांगली ओळख झाली. आणि पुढे त्यांची घट्ट अशी मैत्री सुद्धा झाली. अन त्यांची ही मैत्री आजपर्यंत कायम आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.