स्टार प्रवाह वरील “मुलगी झाली हो” ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. माऊ शोनक सिद्धार्थ यांची भूमिका तर प्रेक्षकांना आवडतेच. पण नकारात्मक भूमिका करणारी दिव्या देखील तितकीच पसंतीस उतरत आहे.
दिव्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर. दिव्या म्हणजेच प्रतिक्षा मुंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने असं म्हटलं आहे की नमस्कार आत्तापर्यंत आपण माझी मुलगी झाली हो या मालिकेतील दिव्या या भूमिकेसाठी भरभरून प्रतिसाद दिला.
प्रचंड प्रेम दिले. यासाठी मी आपली मनापासून आभारी आहे. तुमच्या शुभेच्छा या नेहमी माझ्या पाठीशी असतातच. यापुढील आयुष्यात ही माझ्यावरचे हे तुमचे प्रेम तुमचा प्रतिसाद असाच निरंतर कायम राहो. भेटूया लवकरच धन्यवाद.
तिच्या या पोस्ट वरून ती मालिका सोडत असल्याच थोडक्यात कळत आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण प्रतीक्षा आपल्याला कलर्स वाहिनीवर आजपासून सुरु होणारे “जीव माझा गुंतला” या मालिकेत दिसणार आहे.
प्रतीक्षा या मालिकेत चित्रा खानविलकरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना प्रतीक्षा म्हणाली की मला माझ्या घरी परतल्या सारखं वाटतंय. तब्बल तीन वर्षानंतर मी पुन्हा कलर्स वाहिनीवर काम करीत आहे. याआधी प्रतीक्षाला आपण घाडगे अँड सून या मालिकेत कियाराच्या भूमिकेत पाहिलं होतं.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.