आज आपण एका अशा अभिनेत्या विषयी बोलणार आहोत. ज्यांनी आपल्या करियरची सुरुवात टिकटॉक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. टिक टॉक मुळे मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना मराठी सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
झी मराठीवरील “लागीर झालं जी” या मालिकेमध्ये भैय्यासाहेब नावाची भूमिका केल्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये कमालीची लोकप्रियता मिळाली. आपण बोलत आहोत अभिनेता किरण गायकवाड यांच्याविषयी.
चला तर जाणून घेऊया अभिनेता किरण गायकवाड यांच्या विषयी थोडीशी माहिती. अभिनेता किरण गायकवाड यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या किरणनी आपले शालेय शिक्षण पुणे मधून पूर्ण केलेले आहे.
तसेच त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये यशवंतराव मोहिते महाविद्यालयांमधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची फार आवड होती. त्यामुळे पुढे जाऊन अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे त्यांनी ठरवले होते.
आठवी मध्ये शिकत असताना त्यांच्या शाळेचा स्काऊट कॅम्प भरला होता. आणि या कॅम्पमध्ये त्यांनी छोटेसे नाटक केले होते. आणि हा कॅम्पचा पहिला अभिनय होता आणि या नाटकानंतर शाळेमधील सर्वच नाटकांमध्ये अभिनेता किरण गायकवाड हा सहभाग घेऊ लागला.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता किरण गायकवाड यांनी महिंद्रा कंपनी मध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण 2011साली दीर्घ आजारामुळे त्यांना जॉब सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याचे ठरवले.
लागिर झालं जी या मालिके आधी त्यांनी “बघतोस काय मुजरा कर” आणि “फुंत्रु” यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. पण त्यांना खरी ओळख ही झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेमध्ये केलेल्या भैय्यासाहेब या भूमिकेमुळे मिळाली.
या मालिकेमध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली होती. आणि विशेष म्हणजे ही भूमिका लोकांना खूपच आवडली. त्यानंतर त्यांनी झी मराठीवरीलच “टोटल हुबलक” या शॉर्ट सिरीयल मध्ये काम केले होते.
या सिरीयल मध्ये त्यांनी मोनालीसा बागल यांच्यासोबत काम केले होते. सध्या अभिनेता किरण गायकवाड हा झी मराठीवरील देव माणूस या मराठी मालिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेता किरण गायकवाड आपल्याला डॉक्टर अजित कुमार नावाची भूमिका करताना दिसत आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.