कारभारी लय भारी या मालिकेमधील कांचनची भूमिका साकारली आहे अभिनेत्री पूजा पवार यांनी. त्यांनी निभावलेली कांचन काकीची भूमिका विरोधी जरी असली तरी या अगोदर एक प्रमुख नयिका तर कधी सहनयिका म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला आहे.
त्यांच्याबद्दलच आज आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. झपाटलेला माझा छकुला विदूषक चिकट नवरा यांसारख्या दमदार चित्रपटात अभिनेत्री पूजा पवार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या ऑनस्क्रीन जोडी इतकीच पूजा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती होती.
आजही चित्रपट तितक्याच आपुलकीने पाहिले जातात. कोल्हापूर येथे जन्मलेल्या पूजा पवार यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अभिनेता अजिंक्य देव यांच्यासोबत सर्जा या पदार्पणातील पहिला चित्रपट साकारला.
आणि चांगलाच यशस्वी देखील ठरला. यातील त्यांच्या भूमिकेला गौरवण्यात आले. तिथून पुढे त्यांनी या क्षेत्रात चांगलीच ओळख कमावली. टोपीवर टोपी एक होता विदूषक विश्वविनायक तोंडी सारखे दमदार चित्रपट यांनी साकारली.
झी युवा वरील बापमाणूस या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला रसिकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही आशिकी या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सोबत यांनी काम केले आहे.
पूजा पवार यांना नताशा व आलिशा या दोन मुली आहेत. नताशा सध्या आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत आहे. तर त्यांची थोरली मुलगी आलिशाने आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयासोबत मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे.
मिया टेक्निक्स गिफ्ट सुपर सोनिक यांसारख्या व्यवसायिक जाहिरातींमध्ये ती झळकली आहे. त्यामुळे आलिशा एक स्टार किड म्हणून या क्षेत्रात आपला जम बसवणार आहे. काही पाहणे आता रंजक ठरणार आ.हे एकंदरीत काय तर कारभारी लय भारी या मालिकेतील कांचनची मुलगी देखील एक अभिनेत्री आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.