सोनं खरं आहे वा खोटं, या 5 सोप्या पद्धतीने घर बसल्या जाणून घ्या प्रमाणिकता

भारतात सोन्याची खपत सर्वात अधिक आहे. गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त भारतात फिजिकल गोल्डची देखील मागणी आहे. लोकांना स्वत:जवळ सोनं ठेवण्याची आवड असते. महिलांना सोन्याच्या दागिन्यांची अत्यंत आवड असते. विवाह तसेच इतर मांगलिक समारंभात देखील सोन्याची रक्कम दिली आणि घेतली जाते.

पण हे सोनं किती खरं आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? येथे आम्ही आपल्याला 5 अशा सोप्या पद्धती सांगत आहोत, ज्याद्वारे आपण घरी बसल्या सोनं खरं आहे की खोटं हे माहित करु शकता.

हॉलमार्क
आपल्याला सोन्याची गुणवत्ता बघायची गरज भासणार नाही जर आपण सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क बघाल. हॉलमार्क सोनं खरं असल्याचा प्रमाण आहे. हे प्रमाण भारतीय मानक ब्यूरो द्वारे प्रदान केलं जातं. आपण जाहिरातींमध्ये हॉलमार्कबद्दल ऐकलंच असेल. सरकारने सोन्याचे दागिने आणि आर्टिफेक्ट्ससाठी हॉलमार्किंग आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

मॅग्नेट
मॅग्नेटद्वारे सोन्याची गुणवत्ता मापता येते. खरं सोनं कधीही मॅग्नेटकडे आकर्षित होत नाही. असं झाल्यास यात काही धातू मिसळ्याचे समजावे. एक आणखी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे खर्‍या सोन्यावर जंग लागत नाही. सोन्यावर जंग लागल्यास हे खोटं असल्याचा पुरावा आहे. या कारणामुळे देखील सोनं चुंबकाकडे आकर्षित होईल.

पाणी
फार कमी लोकांना हे माहित असेल की खरं सोनं पाण्यात बुडुतं. होय… खोटं सोनं पाण्यावर तरंगू लागतं. एखाद्या खोल भांड्यात किंवा बाल्टीत पाणी घ्यावे आणि त्या सोनं टाकावं. जर सोनं बुडालं तर ते खरं आहे आणि सोनं तरंगत असल्यास आपली फसवणूक झाल्याचं समजावं.

नाइट्रिक एसिड
व्हिनेगरसारखेच नाइट्रिक एसिड देखील खरं-खोटं याची परख करु शकतं. खर्‍या सोन्यावर नाइट्रिक एसिड टाकल्यास प्रभाव पडत नाही. परंतू सोनं खोटं असेल तर एसिडचा प्रभाव दिसून येईल. केवळ एसिड टाकण्यापूर्वी सोनं जरा घासून घ्यावं. मग घासलेल्या भागावरच एसिड टाकावं. हे काम अगदी सावधपूर्वक करावं कारण एसिड नुकसान करु शकतं.

व्हिनेगर
आपल्या घरात वापरण्यात येणारं व्हिनेगर सोन्याची गुणवत्ता जाणून घेण्यास कामास येतं. सोन्यावर काही थेंब व्हिनेगरचे टाकवं. सोनं खरं असेल तर काहीच प्रभाव पडणार नाही अर्थात खरं असल्यास सोन्यच्या रंगात काहीच फरक होणार नाही. पण सोन्याचं रंग उडत असेल तर समजावे की सोनं खोटं आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *