स्टार प्रवाह वरील “रंग माझा वेगळा” या मालिकेत काही दिवसांपूर्वी एका जोडीची एन्ट्री झाली. ती जोडी म्हणजे मिस्टर अँड मेसेज आठवले. या मालिकेत ही जोडी दीपाला मदत करताना आपण पाहत आहोत.
मिस्टर आठवले यांची भूमिका अभिनेते शिरिष जोशी हे साकारत आहेत. तर मिसेस आठवले यांची भूमिका अभिनेत्री ऋजुता देशमुख या साकारत आहेत. दीपाच्या वाईट काळात हे दोघेही दीपाला मदत करत आहेत.
तर आज आपण जाणून घेणार आहोत मिस्टर अँड मिसेस आठवले बद्दल. अभिनेते शिरीष जोशी आणि अभिनेत्री ऋजुता देशमुख हे दोघेही रंग माझा वेगळा या मालिकेत नवरा-बायकोचे पात्र साकारत आहेत.
पण फार कमी लोकांना माहीत आहे की हे दोघे खऱ्या आयुष्यात देखील नवरा-बायको आहेत आणि त्यांना साजरी नावाची मुलगी देखील आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुख हिला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिलेले आहे.
झी मराठीवरील “कळत-नकळत” ही तिची सगळ्यात गाजलेली मालिका होती. तिने “राजा शिवछत्रपती” “आभाळ माया” “तू माझा सांगाती” “स्वप्नांच्या पलीकडले” आणि सध्याची सोनी मराठी वरील “आनंदी हे जग सारे” अशा अनेक मालिकांमध्ये काम केली आहेत.
तसेच “रायगडाला जेव्हा जाग येते” हे तिचे गाजलेले नाटक आहे. मालिका नाटक या सोबतच अभिनेत्री ऋजुता देशमुख मराठी चित्रपट “तुला शिकवीन चांगलाच धडा” “एक गाडी बाकी आनाडी” “नशीबवान” आणि हिंदी चित्रपट “फॅमिली” यामध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे.
तर अभिनेत्री ऋजुता देशमुख आणि अभिनेते शिरीष जोशी यांची रियल लाईफ जोडी कशी वाटली?
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.