आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणेच आपल्याला कर्म फळ भोगावे लागते आपण आपली वाईट करने कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरीही भगवंत पासून ते लपून राहत नाही आपले कर्म चांगले असेल. तर चांगले आणि वाईट असेल तर वाईट असे फळ आपल्याला मिळत असते आपण चांगले कर्म सगळ्यांसमोर करतो.
परंतु वाईट कर्म कोणाला समजणार नाही अशा रितीने करतो. पण कुठेतरी आपल्या या वाईट कर्मांची नोंद करून त्याचा हिशोब ठेवलेला असतो व त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला जे येईल ते भोगावेच लागते आपण जर एकाच कुटुंबात असलो पण जर आपले कर्म वाईट असेल. तर त्याचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात.
ते कोणीही वाटून घेऊ शकत नाही व इतरांवर त्याचा काहीही प्रभाव सुद्धा पडत एकदा एका माणसाने मासा पकडला व तो खाण्यासाठी घरी घेऊन गेला. पण रस्त्याने जाताना एका बलदंड माणसाने त्याला अडविले आणि तो मासा त्याने जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तो निघून गेला त्या माणसाला खूप वाईट वाटले.
पण त्याच्या कमजोर शरीर यष्टिमुळे आणि कमजोर शरीरामुळे प्रतिकार करू शकला नाही. बलदंड माणूस मासा घेऊन जात असताना तो मासा जिवंत असल्याने तडफडू लागला व त्याने त्याच्या अंगठ्या चावा घेतला व त्याच्या हातातून निसटून तो पळून गेला त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार वाहू लागली.
तो लगेच दवाखान्यात गेला आणि त्याने हाताला पट्टी बांधून आला दोन-तीन दिवसांनी दवाखान्यात हाताची पट्टी काढण्यासाठी तो गेला व बघितले की जखम जास्तच मोठी झालेली आहे डॉक्टरांनी त्याला सांगितले की तुला तुझा अंगठा काढावा लागेल. नाहीतर तुला तुझ्या हाताचा पंजा काढावा लागेल.
त्याने लगेच होकार दिला व अंगठा काढून टाकला दोन-तीन दिवसांनी पुन्हा दवाखान्यात पट्टी काढण्यासाठी तो आला तेव्हा पाहिले तर त्याच्या हाताची जखम अजून वाढलेली होती. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले तुला तुझ्या हाताचा पंजा काढावा लागेल नाहीतर ही जखम कोपऱ्यापर्यंत जाईल कोपरापर्यंत हात गमवावा लागेल.
त्याने पंजा ही काढुन टाकला नंतर दोन-तीन दिवसांनी पुन्हा दवाखान्यात गेल्यावर पट्टी उघडून पाहिले. तर जखम पुन्हा जास्तच वाढली होती मग डॉक्टरांनी सांगितले की कोपर्यापर्यंत हात काढावा लागेल नाहीतर पूर्णत हात जाईल त्याने त्यासाठीसुद्धा होकार दिला कोपरापर्यंत हात काढला पुन्हा दवाखान्यात आल्यानंतर पाहिले.
तर पुन्हा जास्त झाले होते जखम बरी होत नव्हती म्हणून डॉक्टरांनी त्याचा पूर्ण हात काढून टाकला त्याला खूप वाईट वाटले त्याचा एक मित्र त्याला म्हणाला की हे असे काय होत आहे तुझ्या हातून एखादी चूक तर झाली नाही ना त्याशिवाय असे होणार नाही. हे ऐकून त्याच्या लगेच लक्षात आले की दुसऱ्याच्या कष्टावर मी हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याच्या तोंडातला घास हिसकावला.
त्याचे परिश्रम म्हणून मिळालेला मासा मी त्याच्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतला. म्हणूनच मला असा त्रास होत असेल त्याच्या मित्राने त्याला सांगितले की जा आणि त्या माणसाला शोधतो नक्कीच कोणीतरी देव माणूस असणार त्याचे पाय धरले आणि माफी माग म्हणजे नक्की तुझी या कष्टातून मुक्तता होईल.
जाने त्या माणसाचा खूप शोध घेतला आणि तो माणूस समोर दिसताच त्याने त्याचे पाय धरले आणि म्हणाला तुम्ही नक्की कोण आहात तुम्हाला नक्कीच काहीतरी तंत्र-मंत्र येत असेल म्हणूनच मी तुमच्याकडून मासा हिसकावून घेतल्या नंतर तुम्ही माझ्यावर काहीतरी काळी जादू केली. मला त्रास दिला नेमकी तुम्ही काय केले ते मला सांगा व तुमचा श्राप मागे घ्या.
मग त्या माणसाने त्या बलदंड माणसाला सांगितले की मी कोणी तांत्रिक-मांत्रिक नाही मला असं तंत्र-मंत्र काळी जादू बद्दल काही माहिती ही नाही. पण जेव्हा तू माझ्या कडून माझ्या परीश्रमाचे हिसकावून घेऊन गेलास त्यावेळेस मी फक्त आरशाकडे बघून भगवान त्यांना सांगितले की हे देवा ह्या माणसाने मला त्याची ताकद दाखवली व मी काहीही करू शकलो नाही.
तू त्याला तुझी ताकद दाखव हे भगवंता मग भगवंताने तुला त्याची ताकद दाखवली जे केले ते भगवंतांनी केले तुझ्या हातांवर तुझा जोर दाखवत होतास इतरांना त्रास द्यायचा तो हातच भगवंतांनी स्वतःच्या ताकतीने काढून तुझी ताकत संपवून टाकली. यापुढे तू अशा प्रकारे कोणालाही त्रास देऊ शकणार नाहीस तुझ्या कर्माचे फळ तुला मिळाले म्हणूनच लवकर किंवा उशिरा पण कर्माचे फळ हे मिळतच असते काही व्यक्ती खूप वाईट कर्म करतात पण तरीही ते ऐशोआरामात आपले आयुष्य जगत असतात.
पण काही व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून व्यवस्थित विचार करून चांगलेच वर्तन करतात तरीही त्यांच्या जीवनात नेहमीच दुःख व संकटे येत राहतात म्हणून आपण म्हणतो की जे वाईट वागतात. त्यांना भगवंतच चांगले फळ देतात याउलट जे चांगले वागतात त्यांची भगवंत परीक्षा घेतात पण हे असे नाही ते तुमच्या मागच्या जन्माचे कर्म असते जे या जन्मात तुम्हाला ते भोगावे लागते आपण जे काही कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेचच मिळत असते.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.